चंद्रमुखी सिनेमातली चंद्रा कोण आहे हाच प्रश्न सगळी लोक मागच्या महिन्याभरापासून विचारत होते... त्याचं उत्तर मंगळवारी सगळ्यांसमोर आलं.. ही चंद्रा आहे अभिनेत्री अमृता खानविलकर.. गिरगावच्या रॉयल ओपेरा हाऊसमध्ये एक भव्य सोहळा पार पडला... या वेळी अमृताच्या लावणीनं सगळ्यांना मोहिनी घातली होती.